aquaponic
aquaponic
aqua म्हणजे पाणी ponic म्हणजे शेती म्हणजेच पाण्यावरची शेती यामध्ये असे केले जाते कि दोन लहान शेततळे असतात. एका तळ्यामध्ये मासे पाळायचे आणि दुसर्या तळ्यामध्ये पाणी ठेवायचे. तळ्याच्या वरच्या बाजूला खडक,वाळू,विटा,यापासून तयार करायचे म्हणजे त्यामध्ये पाणी सोडले तर ते पाणी खालच्या बाजूला यावे. माश्यांच्या तळ्यामध्ये असलेले पाणी हे त्यावरती तयार केलेल्या बेडवर दोन दिवसांनी सोडून द्यायचे.
पाणी फिरवण्याची पद्धत मोठ्या तळ्यामधून पाणी लहान तळ्यामध्ये सोडले जाते. लहान तळ्यातून पाणी बेडवर सोडले जाते असे दोन दिवस चालू असते. तिसऱ्या दिवशी पाणी बदलले जाते .
aqua म्हणजे पाणी ponic म्हणजे शेती म्हणजेच पाण्यावरची शेती यामध्ये असे केले जाते कि दोन लहान शेततळे असतात. एका तळ्यामध्ये मासे पाळायचे आणि दुसर्या तळ्यामध्ये पाणी ठेवायचे. तळ्याच्या वरच्या बाजूला खडक,वाळू,विटा,यापासून तयार करायचे म्हणजे त्यामध्ये पाणी सोडले तर ते पाणी खालच्या बाजूला यावे. माश्यांच्या तळ्यामध्ये असलेले पाणी हे त्यावरती तयार केलेल्या बेडवर दोन दिवसांनी सोडून द्यायचे.
पाणी फिरवण्याची पद्धत मोठ्या तळ्यामधून पाणी लहान तळ्यामध्ये सोडले जाते. लहान तळ्यातून पाणी बेडवर सोडले जाते असे दोन दिवस चालू असते. तिसऱ्या दिवशी पाणी बदलले जाते .
- पाणी बदलले का जाते ?
- अश्या प्रकारे पाण्यावर शेती आणि मत्स्य पालन केले जाते.
मुरघास तयार करणे
मुरघास तयार करणे
मुरघास
मुरघास हा जनावरांचे खाद्य आहे. यामध्ये असे केले जाते की हिरवा चारा हा अम्बवण्यात येतो आणि यामुळे तो चारा जास्त काळ टिकवण्यात येतो. चाराटंचाईमध्ये याचा फायदा होतो.
मुरघास कोणत्या पिकापासून तयार करता येतो ?
मुरघास हा द्विदल आणि एकदल चाऱ्यापासून करता येतो.
यामध्ये एकदालात ज्वारी मका अश्या चारा पिकाचा उपयोग होतो.
मुरघास तयार करताना लागणारे घटक .
मिनिरल मिक्स्चर , गुळ , युरिया इत्यादी.
युरियाचा वापर १% करायचा.
मुरघास कसा तयार करतात ?
मुरघास तयार करताना प्रथमता चाऱ्याची कुट्टी करून घेतली. चाऱ्याला पसरवून घेतले आणि त्यामधले पाण्याचे प्रमाण थोड्या प्रमाणामध्ये कमी करून घेतले. मुरघासाच्या बागेमध्ये एका फुटाचा थर घेऊन त्यावर मिश्रणाचा शिम्पड केला. आणि त्याला नाचून दाबून त्यामधली हवा काढून घेतली. अश्याप्रकारे ५०० किलोची पिशवी पूर्णपणे भरून घेतली . पिशवीला हवाबंद करून ठेवली.
६० दिवसांनी मुरघास तयार होतो. तयार झालेल्या मुरघासाला मधुर सुवास येतो.
तयार झालेला मुरघास असा दिसतो.
मुरघास हा जनावरांचे खाद्य आहे. यामध्ये असे केले जाते की हिरवा चारा हा अम्बवण्यात येतो आणि यामुळे तो चारा जास्त काळ टिकवण्यात येतो. चाराटंचाईमध्ये याचा फायदा होतो.
मुरघास कोणत्या पिकापासून तयार करता येतो ?
मुरघास हा द्विदल आणि एकदल चाऱ्यापासून करता येतो.
यामध्ये एकदालात ज्वारी मका अश्या चारा पिकाचा उपयोग होतो.
मुरघास तयार करताना लागणारे घटक .
मिनिरल मिक्स्चर , गुळ , युरिया इत्यादी.
युरियाचा वापर १% करायचा.
मुरघास कसा तयार करतात ?
मुरघास तयार करताना प्रथमता चाऱ्याची कुट्टी करून घेतली. चाऱ्याला पसरवून घेतले आणि त्यामधले पाण्याचे प्रमाण थोड्या प्रमाणामध्ये कमी करून घेतले. मुरघासाच्या बागेमध्ये एका फुटाचा थर घेऊन त्यावर मिश्रणाचा शिम्पड केला. आणि त्याला नाचून दाबून त्यामधली हवा काढून घेतली. अश्याप्रकारे ५०० किलोची पिशवी पूर्णपणे भरून घेतली . पिशवीला हवाबंद करून ठेवली.
६० दिवसांनी मुरघास तयार होतो. तयार झालेल्या मुरघासाला मधुर सुवास येतो.
तयार झालेला मुरघास असा दिसतो.
माती परीक्षण
माती परीक्षण
माती परीक्षण का करतात ?
शेतीतून जादा उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मात्र यामुळे शेतीच आरोग्य धोक्यात येऊ लागलं आहे. शेतीच हे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी वेळच्यावेळी आपल्या शेतीतल्या मातीच आणि पाण्याचं परीक्षण करणं हिताच ठरतं.
जमिनीत काही विशेष दोष आढळून आल्यास त्यावर योग्य उपाय शोधणं, पिकांना दिली जाणारी खते प्रमाणशीर न दिल्याने पिकांची जोमदारपणे वाढ होत नाही.तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त खते दिल्याने अनावश्यक खर्च वाढतो. मातीपरीक्षण केल्यामुळे आपल्या शेतीची अन्नद्रव्याची नेमकी गरज शेतकऱ्याला लक्षात येऊ शकते.त्यामुळे खतांच्या वापरात आणि खर्चात बचत होऊन पिकांचे उत्पादनही वाढू शकते.माती परीक्षण हे आपल्या जमिनीमध्ये कोण कोणते घटक आहेत ते पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते .
जमिनीत काही विशेष दोष आढळून आल्यास त्यावर योग्य उपाय शोधणं, पिकांना दिली जाणारी खते प्रमाणशीर न दिल्याने पिकांची जोमदारपणे वाढ होत नाही.तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त खते दिल्याने अनावश्यक खर्च वाढतो. मातीपरीक्षण केल्यामुळे आपल्या शेतीची अन्नद्रव्याची नेमकी गरज शेतकऱ्याला लक्षात येऊ शकते.त्यामुळे खतांच्या वापरात आणि खर्चात बचत होऊन पिकांचे उत्पादनही वाढू शकते.माती परीक्षण हे आपल्या जमिनीमध्ये कोण कोणते घटक आहेत ते पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते .
माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कोणत्या ठिकाणचा घेऊ नये .
- बांधाच्या कडेचा.
- शेतामध्ये टाकलेल्या खताच्या ढिगाऱ्या खालची घेऊ नये .
- जमिनीची माश्यागत करण्याच्या नंतर घेऊ नये .
- एकच ठिकाणची माती घेऊ नये.
- एकाच सरळ रेषेत नमुना घेऊ नये .
- नमुना पिक काढल्या नंतर घ्यावा.
माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा.
मातीचा नमुना घेताना झिग-झ्याग पद्धतीने घ्यावी. सदरच्या ठिकाणी इंग्रजीच्या व्ही अक्षराच्या आकृति प्रमाणे 30 सेंटीमीटर खोल खड्डा घ्यावा व त्या खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. मातीचा नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या कडेची माती काढावी. अशा प्रकारे सर्व खड्डातून माती जमाकरून गोळा केलेल्या सर्व मातीचा ढीग करून त्याचे 4 समान भाग करावे. समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी व उर्वरीत मातीचा पुन्हा ढीग करावा व त्याचे पुन्हा 4 समान भाग करून समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी. ही कृती माती अर्धा किलो शिल्लक असेपर्यंत करावी. वरील माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी. ही अर्धा किलो माती प्लास्टिक पिशवीत भरावी आणि खालील माहिती एका कागदावर लिहून तो कागद पिशवीत टाकावा -
1. नमुना क्रमांक
2. नमुना घेतल्याची तारीख
3. शेतक-याचे संपूर्ण नाव
4. गाव आणि पोस्ट
5. तालुका
6. जिल्हा
7. सर्व्हे किंवा गट क्रमांक
8. नमुन्याचे प्रातिनिधीक क्षेत्र
9. बागायत किंवा जिरायत
10. मागील हंगामातील पिक आणि वाणाची जात
11. पुढील हंगामातील पिक आणि वाणाची जात
12. मातीची खोली (सेंटीमीटर मध्ये)
13. जमिनीचा उतार किंवा सपाट
14. जमिनीचे काही विशेष लक्षणे-खारवट, चोपण, आम्ल व इतर
15. पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट
16. माती नमुना गोळा करणा-याची सही.
एवढे झाल्या नंतर माती परीक्षण केंद्राकडे पाठवण
गाई चे अंदाजे वजन करणे
माघील आठवड्यात मी गाई चे अंदाजे वजन करायला शिकलो ,सचिन सरानी मला शिकवला ,मीटर टेेप च्या मदतीने गाई ची छाती मोजून घ्यायची त्या नंतर गाई चे माकड हाड(Monkey Bone) मोजावे सेमी.मध्ये
माकड हाडा चे मोज माप =अ
छाती चे मोजमाप=ब
त्या नंतर खालील सूत्रात किमती टाकून घेतल्या
(अ *अ * ब )/(१०४००) r
आमच्या कडे असणाऱ्या गाई चे वजन मी असे काढले
अ=150
ब=152
(१५०*१५०*१५२)/१०४००
=३२८
एवढे वजन आले
जीवामृत:प्रमाण 1 एकर साठी:
200 लीटर पाणी + 10 किलो देशी गार्इचे शेन + 5 ते 10 लीटर देशी गाइचे गोमुत्र + 1 किलो गुळ किंवा 4 लिटर ऊसाचा रस+1 किलो बेसन + 1 मुठ बांधावरची जीवाणू माती हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवावे. दिवसातून दोनदा सकाळ व संध्याकाळ काठीने ढवळावे.
महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना 200 ते 400 ली. जीवामृ त दयावे.
ते वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवस आहे.
फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा :
फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा :
पहिल्या वर्षी:पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड
व नंतरचे 6 महिने 500 मिली जीवामृत प्रति झाड
दुसऱ्या वर्षी: प्रती झाड 1 ते 2 लिटर जीवामृत प्रति झाड
तिसरया वर्षी: प्रती झाड 2 ते 3 लिटर जीवामृत प्रति झाड
चौथ्या वर्षी: प्रती झाड 4 ते 5 लिटर जीवामृत प्रति झाड
पाचव्या वर्षी: प्रती झाड 5 ते 10 लिटर जीवामृत प्रति झाड
आणी त्यानंतर 5 लिटर प्रती झाड हे प्रमाण कायम राहील
जिवामृताच्या फवारण्या:
1.खरिप पिकांसाठी: प्रमाण प्रती एकर
पहिली फवारणी: पेरणीच्या 30 दिवसांनी
100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत
दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीच्या 20 दिवसांनी
150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत.
तिसरी फवारणी: दुसऱ्या फवारणीच्या 20 दिवसांनी
200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत.
शेवटची फवारणी : फळ बाल्यावस्थेत/ दाने दूध अवस्थेत असताना.
200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक.
2.भाजीपाला पिकांसाठी प्रमाण प्रती एकरी
1 ली फवारणी : पेरणीनंतर 1 महिन्यानी
100 लि. पाणी + 5 लि.गाळलेले जिवामृत
2 री फवारणी : पहिल्या फवारणीच्या 10 दिवसांनी
100 लि. नीमास्त्र किंवा 100 लि.पाणी + 3 लि.दशपर्णीअर्क
3 री फवारणी : दुसऱ्या फवारणीच्या 10 दिवसांनी
100 लि. पाणी + 2.5 लि. आंबट ताक
4 थी फवारणी : तिसऱ्या फवारणीच्या 10 दिवसांनी
150 लि. पाणी + 10 लि.गाळलेले जीवामृत
5 वि फवारणी : चौथ्या फवारणीच्या 10 दिवसांनी
150 लि. पाणी + 5 लि.ब्रम्हास्त्र किंवा
150 लि. पाणी + 5 ते 6 लि. दशपर्णीअर्क
6 वी फवारणी : पाचव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
150 लि. पाणी + 4 लि. आंबट ताक
7 वी फवारणी : सहाव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
200 लि. पाणी + 20 लि.गाळलेले जीवामृत
8 वी फवारणी : सातव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
200 लि. पाणी + 6 लि.अग्नीस्त्र किंवा
200 लि. पाणाी + 8 ते 10 लि. दशपर्णीअर्क
शेवटची फवारणी :आठव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक किंवा
200 लि. सप्तधान्यांकुर अर्क
3.नविन फळबागांसाठी :प्रमाण प्रती एकर
1 ली फवारणी :कलम लावल्यानंतर 1 महिन्यानी
100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत
2 री फवारणी : पहिल्या फवारणी नंतर 1 महिन्यानी
150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत
3 री फवारणी :दुसऱ्या फवारणी नंतर 1 महिन्यानी
200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत
व पुढील फवारण्या ह्याच प्रमाणात ठेवाव्यात.
प्रतिमाह 200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत
जीवामृत व पाणी हे नेहमी दुपारी 12 वाजता पडणाऱ्या झाडाच्या सावलीच्या बाहेर दयावे.
4.उभ्या झाडांमध्ये जीवामृत फवारणी वेळापत्रक :(वय 5 ते 10 वर्ष)
फळे तोंडणीनंतर तुटलेल्या देठाच्या भागांतुन स्त्राव बाहेर निघतो व त्या स्त्रावाची मेजवानी घेण्यासाठी हानीकारक बुरशी वाढायला लागते व फांदयामध्ये प्रवेश करतात व झाडांना बुरशीजन्य रोग होतात. म्हणून जीवामृताच्या फवारणी व वाळलेल्या काडया काढल्या पाहिजेत .
झाडाला विश्रांती दिल्यानंतर व फळ तोंडणी नंतर 2 महिण्यानंतर
200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत गाळलेले
ह्य फवारणी नंतर नवीन बहार येईपर्यंत प्रति महिना फवारणे.
झाड जेव्हा फुलांवर येतात तेव्हा पासून कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात.
फळ लागल्या नंतर(फळ धारणा) सुरूवात झाल्यानंतर आलटून पालटून प्रत्येक 15 दिवसांनी जीवामृत व ताकाची फवारणी करावी
प्रमाण: 200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत
200 लिटर पाणी + 6 लिटर आंबट ताक
जीवामृत 48 ते 72 तासात तयार होते. तयार झाल्यानंतर 7 दिवसांपर्यंत वापरता येते. कारण 7 दिवसांपर्यंत किनवन क्रिया सुरळीत चालू असते व संजीवकांची निर्मीती अव्याहत चालू असते. परंतु 7 दिवसानंतर सडण्याची क्रिया चालू होते व जीवामृताचा येतो जीवामृतामध्ये बाहेरचे कोणतेही संजीवक वापरू नये. फक्त जीवामृताची फवारणी करावी.
जीवामृताच्या फवारण्या का?
1) जीवामृत हे जीवाणूचे विरजन आहे व सोबतच ते अत्यंत चांगले बुरशी नाशक, विषाणू नाशक आहे. त्यामुळे त्याच्या फवारणीने बुरशी, विषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येते.
2) कोणत्याही झाडाचे एक चौरस फुट पान प्रकाश संश्लेषनक्रिये द्वारे सुर्यप्रकाशातून फोटान कणांचा रुपात एका दिवसाला 12.5 किलो कॅलरीज गोळा करते. सोबतच मुळयांनी जमिनीतून घेतलेल्या पाण्याशी व पानांनी घेतलेल्या कर्बाम्लाचे सोबत रासायनिक संयोग होऊन त्यापासून 4.5ग्रॅम अन्न निर्मिती होते. संध्याकाळी त्या अन्नाची विल्लेवाट लावले जाते. त्यापैकी काही अन्न मुळयावाटे जमिनीतील जीवाणुंना खाऊ घातल जाते व काही अन्न श्वसनासाठी खर्च होतो. काही अन्न दुसऱ्या दिवशीच्या झाडाच्या वाढीसाठी खर्च होतो व शिल्लक राहिलेल अन्न दाण्याचे पोषण शेंगा व फळांचे पोषण होण्यासाठी वापरले जाते. किंवा ऊसाच्या खोडामध्ये साठवले जाते. या एका दिवसात तयार झालेले अन्न 4.5 ग्रॅम अन्ना पैकी आपल्याला 1.5 ग्रॅम धान्याचे उत्पादन मिळते किंवा 2.25ग्रॅम फळाचे टनेज मिळतं .
जेव्हा आपण एक चौरसफुट पानांत 4.5ग्रॅम अन्न निर्मिती करतो तेव्हा आपल्याला 1.5 ग्रॅम अन्नधान्य व 2.25 ग्रॅम फळाचं टनेज मिळतं . हा टनेज आपल् याला एक चौरसफुट पानावर जमा होणारी 12.5कॅलरी सूर्य ऊर्जा होय. म्हणजे जर आपण पानांचा आकार दुप्पट केला तर आपल्याला टनेजसुद्धा जास्त मिळेल. पानांचा आकार वाढवणारे हारमोंस जीवामृतामध्ये असतात व जीवामृतांची फवारणी केल्याने आपल्याला चमत्कार दिसतो.
3) कधी कधी जोरदार पाऊस झाल्यानंतर किंवा पिकाला पाणी दिल्यानंतर मुळी जवळच्या सगळया पोकळया पाण्यांन भरतात त्यामुळे पोकळयांमधील हवा निघून जाते व जीवाणूंना व मुळयांना प्राण वायू मिळत नाही व पिकं पिवळ पडतात कारण जमिनीतून नत्राचा पुरवठा थांबलेला असतो. अशा वेळी झिरोबजेट नैसर्गिक शेती मध्ये अॅसेटो डायझोट्रॉपीकस जीवामृतांची फवारणी केल्यानंतर जीवामृतात असलेले अॅसेटो डायझोट्रॉपीकस जीवाणू पानावर पसरतात व हवेतून नत्र घेऊन पानांना देतात. एवढेच नाही तर अशा आणीबाणीच्या काळात हवेत तरंगणारे धुळीचे कण हे जीवाणू खेचून घेतात व पानांना खनिजं उपलब्ध करतात .
Sktechup.......